भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयेकाळीं देव गोकुळीं भरले । अगोचर रूप झाले ठायीं ठायीं

tayekalin dev gokulin bharale | agochar rup jhale thayin thayin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तयेकाळीं देव गोकुळीं भरले । अगोचर रूप झाले ठायीं ठायीं ॥१॥ सकळ संपत्ति भरूनि उरल्या । दिगंतरीं गेल्या विपत्ति त्या ॥२॥ नामदेवा तेव्हां आनंद तो झाला । गोकुळीं भरला पांडुरंग ॥३॥