भजनी मालिका
← भजनांकडे परत

तत्वमसी वाक्य उपदेशिलें तुज । तें तूं जीवीं कां अझून धरिसी दुर ॥ध्रु

tatvamasi vakya upadeshilen tuj | ten tun jivin kan ajhun dharisi dur ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तत्वमसी वाक्य उपदेशिलें तुज । तें तूं जीवीं कां अझून धरिसी दुर ॥ध्रु०॥ त्रिभुवनापरता धांवतोसी दुरी । आधीं तूं आपुली शुद्धि करी । उदय अस्तु झाला कवणीये घरीं । पिंडा माझारीं पोहेपां ॥१॥ जागृतीमध्यें कवण जागतें । दोहीं माजीं स्वप्न कोण देखतें । सुषुप्तीमध्यें कोण नांदतें । मग अनुवादतें तें कवण ॥२॥ जागृती वरोनी करीं चिंतन । सुषुप्तीमाजीं रीघे ज्ञान । दोन्हीं माजीं स्वप्न देखे कवण । जीव कीं मन सांगपां ॥३॥ निद्रा मरण हें एक स्थान । दोहींचा देखणा जाणें आपण । लहान सुईंच्या इंधनाहून । आढळले मन पांचासीं ॥४॥ इंद्रियें चपळ चेइलीं । जागत होती ती कां परतलीं । जाऊनियां कवणा घरीं लपालीं । मना मिळालीं कवणें गुणें ॥५॥ सांगतां तेथें अनुवाद कैंचा । नाहीं तूं पण खुंटली वाचा । विष्णुदास नामा बोलिला साचा । परम पदीं बैसलासे ॥६॥