भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरले तरतील हा भरंवसा । पुढती न येती गर्भवासा

tarale taratil ha bharanvasa | pudhati na yeti garbhavasa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तरले तरतील हा भरंवसा । पुढती न येती गर्भवासा ॥१॥ वाट सांपडली निकी । विठठल नाम ज्याचे मुखीं ॥२॥ तीर्थे इच्छती चरणीचें । रज नामधारकाचें ॥३॥ प्रायश्चित सोडोनीं प्रोढी । जाली दीन रुपें बापुडीं ॥४॥ ऋद्धी सिद्धी महाद्धारीं । मोक्ष वोळंगण करी ॥५॥ नामा म्हणे सुखनिधान । नाम पतित पावन ॥६॥