भजनी मालिका
← भजनांकडे परत

तपें दानें व्रतेम यज्ञाचिया कोडी । तुकितां जालीं थोकडीं हरिनामें

tapen danen vratem yadnyachiya kodi | tukitan jalin thokadin harinamen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तपें दानें व्रतेम यज्ञाचिया कोडी । तुकितां जालीं थोकडीं हरिनामें ॥१॥ न पुरे त्यांसी घातलीं त्रिभुवनींची तीर्थे । नयेची पुरतें रामनामेंसी ॥२॥ नाहीं या जीवांचें बोलणें शिवाचें । उपदेशिलें वाचे शक्तिप्रती ॥३॥ नाम नाहीं वाचे हाचि पै निषेधु । विधी हा गोविंदु स्मरलिया ॥४॥ श्रेष्ठ सर्व नाम शिवाचें बोलणें । युक्ति अनुमानें न बोले कांहीं ॥५॥ नामेंचि भक्त ते पावले अपार । नामें पतित नर उद्धरले ॥६॥ नामें पशु गजेंद्राचा तो उद्धार । वाल्मिकें विचार हाचि केला ॥७॥ गगनीं धुरु केला अढळ नामें देखा । नामेंचि गणिका उद्धरली ॥८॥ नामें ते आपदा न बाधी प्रल्हादा । मुखीं नाम सदा उच्चारितां ॥९॥ कृपाळू नाम पैं मेघ हाचि सार । भीष्में युधिष्ठिरा उपदेशिलें ॥१०॥ हरिनामापरतें नाहीं विचारीतां । नवमाध्यायी गीता कृष्ण सांगे ॥११॥ सकल अमृत श्रीहरींचे नाम । त्यामाजीं उत्तम राजनाम ॥१२॥ म्हणोनी सदाशिवेम धरिलें मानसीं । हेंचि गिरिजेसी उपदेशिलें ॥१३॥ तारक ब्रह्ममंत्र राजनाम जाण । विश्वनाथ श्रवण करीतसे ॥१४॥ कीर्तन श्रवण हेंचि पै हो काशी । म्हणोनी मानसीं राम जपा ॥१५॥ विरंची सकळ शास्त्र विचारितां । हरिनामापरता मंत्र नाहीम ॥१६॥ कळिकाळा त्रास हरिनामकीर्तनें । पतितपावन प्राणी होय ॥१७॥ कलियुगीं धर्म हरीचें हें नाम । म्हणोन शुकदेवें वाखणिलें ॥१८॥ नामयाचा स्वामी पंढरीचा रावो । रुखमाईचा नाहो गाऊं गीतीं ॥१९॥