भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव पुसती होय माता । तुम्हीं झणें खेद करा चित्ता

tanv pusati hoy mata | tumhin jhanen khed kara chitta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव पुसती होय माता । तुम्हीं झणें खेद करा चित्ता । तरी ज्ञानासारिखा कां आतां । समाधीसी बैसवितां ॥१॥ हें सांगावेम सविस्तर । याचे कोण कोण अवतार । बंधु त्रिवर्ग हे साचार । आणि ते भगिनी ॥२॥ देव म्हणती ब्रह्मा होय । सोपान देव नेणसी काय । निवृत्ति शिव ज्योतिर्मय । ज्ञानदेव ब्रह्म निघोंट ॥३॥ ऐसे ब्रह्मा विष्णु हर । मुक्ताई ते मूळमाता साचार । तारावया चराचर । कलिमाजीं अवतरलें ॥४॥ रुक्मिणी पुसे देवासी । कां कलिमाजीम जन दोषी । हे घातली देवा पुसी । ते सांगती महाविष्णु ॥५॥ तरी ऐके हो साचार चित्तें । तूं काय नेणसी त्या व्यासातें । ग्रंथीं सांगितलें भारतें । कलिमाजीं जन दोषी ॥६॥ कृष्ण अवतार जाला । पांडवी निजठाव ठाकिला । तेथून एक शकु जाला । जनमेजयापासूनि ॥७॥ तया मार्गे विक्रमशक । पुण्यवित्र सकळ लोक । कलियुगी पुण्यश्लोक । उज्जनिये नांदती ॥८॥ तेणें एक शत पंचतीस । हरिले कळिकाळदोष । पुढें शालिवाहन होवयास । अवतार जाण पैठणीं ॥९॥ तो हा शालिवाहन । अठरा हजार जाण । तें क्षेत्र प्रतिष्ठान । गंगातीरीं प्रत्यक्ष ॥१०॥ या शकामाजीं प्रथम । राजा भोज उत्तम । मग पुण्यपुरुष जन्म । थोडे घेती कलियुगीं ॥११॥ राजे भ्रष्ट यवन जाले । ठायीं ठायीं दोष घडले । मग इहीं अवतार घेतले । कलिदोष हरावया ॥१२॥ रुक्मिणी म्हणे स्वामी । सत्य सांगितलें तुम्ही । पुरानप्रसिद्ध आम्ही । अवतार चरित्र जाणतसों ॥१३॥ नामा म्हणे पुढें हे जन । यवनसंसर्गें कठिण । होता गातां हरीचे गुण । ते उद्धरती सर्वथा ॥१४॥