भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव म्हणती द्विज परियेसी गुणनिधी । प्रतिपादिले वेदीं जे जे धर्म

tanv mhanati dvij pariyesi gunanidhi | pratipadile vedin je je dharma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव म्हणती द्विज परियेसी गुणनिधी । प्रतिपादिले वेदीं जे जे धर्म ॥१॥ ते ते आचरावे विहित क्रियाकर्म । जें जें वर्णाश्रमें आलें जया ॥२॥ तेचि एक धन्य जगीं देहधारी । असतां संसारीं जीवन्मुक्त ॥३॥ आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म । शौच नित्यनेम सत्यवाणी ॥४॥ तप शम भूतदया पूर्ण । अखंड अनुसंधान स्वस्वरुपीं ॥५॥ स्नानसंध्या जप होम अध्ययन विधि । देवतार्चन सिद्धि करुनी भावें ॥६॥ वैश्वदेव आणि अतिथीपूजन । नववें ब्रह्मयज्ञ आवश्यक ॥७॥ संपादुनि हे विधि सारावेम भोजन । त्यावरी श्रवन पुराणाचेम ॥८॥ सर्व काळ व्हावेम मानस । असावा विश्वास वेदवचनीं ॥९॥ तुम्हीं तंव सर्वज्ञ संपन्न चतुर । देखावा विचार विशुद्धीचा ॥१०॥ सांडुनि अभिमान व्हावें शुद्धमती । जोडावी ते कीर्ति उभय लोकीं ॥११॥ जावे चंद्रभागे करावेम मंत्रस्नान । द्यावें हेमदान सत्वशुद्धी ॥१२॥ पुण्यजना एकी क्षेत्रप्रदक्षिणा । करावी पावन उभयकुळें ॥१३॥ ऐकोनी पंढरिरावो बोलते जाले वाचा । आज्ञा ते शिरसा स्वामियांची ॥१४॥ परी काया वाचा मनें मागेन ते द्यावें । माझ्या सांभाळावें नामयासी ॥१५॥