भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव बोलत उद्धव । धन्य धन्य हा देवाधिदेव

tanv bolat uddhav | dhanya dhanya ha devadhidev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव बोलत उद्धव । धन्य धन्य हा देवाधिदेव । धन्य धन्य ज्ञानदेव । निजभक्त आवडता ॥१॥ धन्य तीर्थ इंद्रायणी । धन्य प्रत्यक्ष शूळपाणि । तारक ब्रह्म त्रिवेणी । मिश्रित रुपें वहातुसे ॥२॥ चिंतामणि हे पाषाण । दिव्य वनवल्ली जाण । जेथें लागले हरिचे चरण । ते धन्य आळंकापुरी ॥३॥ जेथें समाधिसी बैसतां । इंद्रादि सामोके येती तत्वतां । वैकुंठा जाईल निभ्रांता । रामकृष्ण उच्चारित ॥४॥ यम न पाहे इकडे । काळ नमस्कारी वाडेंकोडें । म्हणती पाहा हो केव्हढें । भाग्य या ज्ञानदेवाचेम ॥५॥ ऐसें उद्धव सांगे रुक्मिणी । होय म्हणती चक्रपाणि । पंढरीहुनि हे जुनाटपुराणी । शैवागमीं बोलिलेसे ॥६॥ ज्ञानदेवेम नमस्कार केला । नामा ह्रदयीं धरिला । प्रीतीनें पुढती अलिंगिला । म्हने धन्य धन्य रे सखया ॥७॥ नामा लोळत गडबडां । चरणजालागीम जाला वेडा । केशव म्हणे तूं धडफुडा । विष्णुभक्त साचार ॥८॥