भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळ विणे मृदंग वाजती अपार । नारद तुंबर गीत गाती

tal vine mrudang vajati apar | narad tumbar git gati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
टाळ विणे मृदंग वाजती अपार । नारद तुंबर गीत गाती ॥१॥ शुक वामदेव अंबऋषि सादर । मध्यें ज्ञानेश्वर ब्रह्मरुप ॥२॥ पिपिलिकेसी मार्ग जावया न मिळे । जाती भार मेळे वैष्णवांचे ॥३॥ नामा म्हणे देवा दाविली नवाळी । पुरविली आळी ज्ञानोबाची ॥४॥