भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळ हे मृदंग गायनें पुढतीं । रंजविती निवृत्ति अवघेजण

tal he mrudang gayanen pudhatin | ranjaviti nivrutti avaghejan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
टाळ हे मृदंग गायनें पुढतीं । रंजविती निवृत्ति अवघेजण ॥१॥ गीतार्थ करिती योगी मुनिजन । रंजविती मन निवृत्तीचें ॥२॥ आत्मसुख एक बोलती बोलणीं । ज्ञानराज मनीं आठवतो ॥३॥ ज्ञानराजें आमुचे निवविले डोळे । आतां ऐसे खेळे नाहीं कोणी ॥४॥ ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखीं । आतां ऐसी सखी नाहीं कोणी ॥५॥ नामा म्हणे स्वामी सांगतां प्रमाण । ऐकतां श्रवण खेद वाटे ॥६॥