भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख सेजेवरि देव विश्रांति पहुडले । विश्रांतीसी गेले सकळ भक्त

sukh sejevari dev vishranti pahudale | vishrantisi gele sakal bhakta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुख सेजेवरि देव विश्रांति पहुडले । विश्रांतीसी गेले सकळ भक्त ॥१॥ ब्रह्मवीणा करीम घेऊनि ब्रह्मसुत । जाणवी एकांत नारदमुनी ॥२॥ बाप पंढरीनाथ सुखाचा सुखसिंधु । नित्य नवा आनंदु सोहळा करी ॥३॥ विश्रांति विसांवा जें विश्वमंगळ । तें नाम निर्मळ विठोबाचें ॥४॥ तो भक्तशिरोमणी वैराग्य पुतळा । गातो प्रेमकळा धरुनी कंठीं ॥५॥ तेणें श्रवनामृतें ह्र्दय कोंदाटलें । प्रेमाचे सुटले पाझर नयनीं ॥६॥ हर्षे निर्भर दोनी देव नारदमुनी । प्रीति आलिंगनी एकमेकां ॥७॥ जाती चंपक सुमनें माजीं तुळसीमिश्रित । दिधल्या त्या उचित कंठीं माळा ॥८॥ नमस्कार करुनि केलें विसर्जन । भरलें त्रिभुवन ब्रह्मरसें ॥९॥ मग चालिले तेथोनि ऋषी नारदामुनी । ह्रदयीं संजीवनी कृष्णनाम ॥१०॥ तेणें त्या विश्रांती नित्य तृप्ती मनीं । नामा जीवें चरणीं विनटला ॥११॥