भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोये सांडिली सर्वांची । जोडी केली विठोबाची

soye sandili sarvanchi | jodi keli vithobachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोये सांडिली सर्वांची । जोडी केली विठोबाची ॥१॥ मायबापासी टाकिलें । ध्यान देवाचें लागलें ॥२॥ स्त्री पुत्र बंधु बहिणी । केली सर्वांची सांडणी ॥३॥ गणगोत इष्टमित्र । सर्व जोडिलें विठ्ठलपात्र ॥४॥ गोणाई म्हणे नामा । भली केली बारे सीमा ॥५॥