भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोयरिक सांडियली सर्वांची । जोडी केली विठ्ठलाची

soyarik sandiyali sarvanchi | jodi keli viththalachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोयरिक सांडियली सर्वांची । जोडी केली विठ्ठलाची ॥१॥ लोभ सांडिला सर्वांचा । संग धरिला विठोबाचा ॥२॥ जालों निधडा नि:शंक । गायनाचें कौतुक ॥३॥ प्रेमभरित सर्वदा । मुखीं नाम हरि गोविंदा ॥४॥ ऐसा सर्वकाळ गाय । भावें विठोबाचे पाय ॥५॥ नामा म्हणे ऐकें हरी । दासी जनीची वाट करी ॥६॥