भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा । विठोबा निजाचा मायबाप

soyara sukhacha visava bhaktancha | vithoba nijacha mayabap

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा । विठोबा निजाचा मायबाप ॥१॥ कृपाळू दीनाचा बडिवार नामाचा । तोडर ब्रीदाचा साजे तया ॥२॥ काया मनें वाचा संग धरा त्याचा । अनंत जन्माचा हरेल शीण ॥३॥ नामा म्हणे विठो अनाथा कुवासा । तारिल भरंवसा आहे मज ॥४॥