भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोवळ्यानें हरि वाढतो सकळां । मनींचा कळवळा कोण जाणे

sovalyanen hari vadhato sakalan | manincha kalavala kon jane

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोवळ्यानें हरि वाढतो सकळां । मनींचा कळवळा कोण जाणे ॥१॥ रुक्माईचे कानीं सांगितली गोष्ट । विस्तारावें ताट ज्ञानदेवा ॥२॥ राही रुक्माबाई वाढिती आवडीनें । सोडितो पारणें ज्ञानदेव ॥३॥ नामा म्हणे देवा परब्रह्म अन्न । जातों बोलावण ज्ञानदेवा ॥४॥