भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपान वटेश्वर पातले समोर । केला नमस्कार निवृत्तीसी

sopan vateshvar patale samor | kela namaskar nivruttisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोपान वटेश्वर पातले समोर । केला नमस्कार निवृत्तीसी ॥१॥ म्हणे मुक्ताबाई जाती दोघेजण । ऐसें नारायणें बुझाविलें ॥२॥ गरुड हनुमंता परिसा भागवता । मग साधुसंता श्रुत केलें ॥३॥ गंधर्वा आणि देवा कळला वृत्तान्त । जाती उभयतां समाधीसी ॥४॥ नामा म्हणे यांनीं आरंभिलें हित । करितो स्वहित पांडुरंग ॥५॥