भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोधोनियां चारी वेद । सार काढोनियां भेद

shodhoniyan chari ved | sar kadhoniyan bhed

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शोधोनियां चारी वेद । सार काढोनियां भेद ॥१॥ मना जाण जाण जाण । विठोबाची प्रेमखुण ॥२॥ साहि शास्त्रांचें संमत । मंथूनि काढिलें यथार्थ ॥३॥ याज्ञिकांची जीवनकळा । जन्मनीचा जो जिव्हाळा ॥४॥ नामा म्हणे माझे बापें । साधि-यलें संतकृपें ॥५॥