भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा

shiv bramhan vishnu tinhi dev ek | je nirakar samyak viththal majha

रचनाकार: संत सावता · अभंग
शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल नामाचा महिमा अगाध । होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥ अद्वैत वासना संतांचि संगती। रायांची उपाधी बोलू नये ॥३॥ हरि मुकुंद मुरारी…. । हा मंत्र उच्चारि, सावता म्हणे ॥४॥