भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे

shevatili pali tevhan manushya janma | chukaliya varma phera pade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥ एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥ संसारीं असावें असोनि नसावें । कीर्तन करावें वेळोवेळां ॥३॥ नामा ह्मणे विठो भक्ताचिये द्वारीं । घेऊ-नियां करीं सुदर्शन ॥४॥