भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां

sheshaprati bole lakshmicha to var | chala avatar gheun atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥१॥ पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्‍हाणें सुरवर सांगूं आले ॥२॥ शेष ह्मणे मज श्रम झाले फार । यालागीं अवतार मी न घेचि ॥३॥ रामअवतारी झालों लक्षुमण । सेविलें अरण्य तुह्मां-सवें ॥४॥ चैदा वर्षांवरी केलें उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हें ॥५॥ नामा ह्मणे ऐसें वदे धरणीधर । हांसोनी श्रीधर काय बोले ॥६॥