भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेंदूर पारवे नीळवर्ण ठसे । जनीं वनीं दिसे परब्रह्म

shendur parave nilavarna thase | janin vanin dise parabrahma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शेंदूर पारवे नीळवर्ण ठसे । जनीं वनीं दिसे परब्रह्म ॥१॥ मुक्ताफळ भरित सबाह्य कोंदलें । रूप हें चांगलें विठोबाचें ॥२॥ श्वेत पीतवर्ण आंत तारांगण । अंकुरलें गगन नानारूपें ॥३॥ ज्योतिर्मय ब्रह्म एकांतीचें पहाणें । समाधि नारायणें उदय केली ॥४॥ संत स्वरूप अवघें अवलोकिलें मनें । नमन नामा म्हणे आरंभिलें ॥५॥