भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेळ्या मेंढियांचा खेळ । आतां खेळूंरे सकळ

shelya mendhiyancha khel | atan khelunre sakal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शेळ्या मेंढियांचा खेळ । आतां खेळूंरे सकळ ॥१॥ कोणी मेंढया होती । कोणी चोर म्हणताती ॥२॥ म्हणती रात्र झाली । आतां निजे वनमाळीं ॥३॥ कोणी श्वान होती । चोरा ड-साया धांवती ॥४॥ तेथें व्योमासुर येत । गोपाळाचा वेष धरित ॥५॥ करोनियां चोरी । नेऊन ठेवी पर्वतदरीं ॥६॥ हें तो देवासि कळलें । नामा ह्मणे संहारिलें ॥७॥