भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरणागता तारी भवसिंधु त्वरीत । ठेवीं बा तो हात शिरावरी

sharanagata tari bhavasindhu tvarit | thevin ba to hat shiravari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शरणागता तारी भवसिंधु त्वरीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥१॥ अरण्यांत दुष्ट दैत्यांसी मारीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥२॥ वेणू पांवा जया हातांत शोभत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥३॥ घेवोनी शिदोर्‍या गडयांसी वांटीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥४॥ रक्षावया व्रजां उचलिला पर्वत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥५॥ सुवर्णाचीं कडीं भूषणें अमूप । पाहतां निष्पाप नामा म्हणे ॥६॥