भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण आलों नारायण । आतां तारीं हो पावना

sharan alon narayan | atan tarin ho pavana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शरण आलों नारायण । आतां तारीं हो पावना ॥१॥ शरण आला मारुतिराया । त्याची दिव्य केली काया ॥२॥ शरण प्रल्हाद तो आला । हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥ जनी म्हणे देवा शरण । व्हावे भल्याने जाणोन ॥४॥