भजनी मालिका
← भजनांकडे परत

शाममूर्ति डोळस सुंदर सांवळी । तें ध्यान ह्लदय- कमळीं धरूनि ठेला

shamamurti dolas sundar sanvali | ten dhyan hladay- kamalin dharuni thela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शाममूर्ति डोळस सुंदर सांवळी । तें ध्यान ह्लदय- कमळीं धरूनि ठेला ॥१॥ सकळ स्थिति सुखाचा अनुभव झाला । सकळ विसरला देहभाव ॥२॥ पांगुळलें मन स्वरूपीं गुंतलें । बोलणें खुंटले प्रपंचाचें ॥३॥ सबाह्याभ्यंतरीं स्वरूप कोंदलें । द्वैत निरसिलें चंद्राकारें ॥४॥ निजरूप निर्धारितं नयन सोज्वळ झाले । रोमांच दाटले रवरवीत ॥५॥ नामामृताचा घन वोळला अंबरीं । वर्षाव सहस्र धारीं होत असे ॥६॥ तें क्षीर सेवितां झालें समाधान । चुकलें जन्म-मरण कल्पकोडी ॥७॥ सहज सुखें निवाला भवदु:ख विसरला । विसांवा भेटला पांडुरंग ॥८॥ नामा ह्मणे देवा दृष्टि लागो झणीं । पुंडलिका धर्में करूनि जोडलासी ॥९॥