भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व जिवां करी कारुण्य । वाचे सत्य उच्चारण । नित्य नामस्मरण । तोचि दास भगवंताचा

sarva jivan kari karunya | vache satya uchcharan | nitya namasmaran | tochi das bhagavantacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्व जिवां करी कारुण्य । वाचे सत्य उच्चारण । नित्य नामस्मरण । तोचि दास भगवंताचा ॥१॥ धन्य धन्य भूमंडळीं । धन्य धन्य साधुवचन पाळी । वेदमर्यादा वेगळी । कार्येम न करी सर्वथा ॥२॥ प्रात:काळीं उठुनी । नरहरिनाम उच्चारूनि । उभा राहूनि कीर्तनीं । जय जय नामें गर्जतसे ॥३॥ देवभक्ति आवडे ज्यासी । पुण्यप्रारब्ध ह्मणती त्यासी । जो उपजोनि आपुले बंशीं । पूर्वजांसि उद्धरितो ॥४॥ तीर्थें एक भावभजन । नित्य नित्य तें पिंड-दान । भूतदया तें भागीरथी स्नान । तेथ जनार्दन उभा असे ॥५॥ देखिलिया ब्राह्मण । वेदांसमान देत मान । यथाशक्ति करूनि दान । अतिथिपूजन जो करी ॥६॥ नामा म्हणे तोचि तरे । वैकुंठ तेथें उतरे । तीर्थें ह्मणती तो त्वरें । पाहों दृष्टी एकवेळा ॥७॥