भजनी मालिका
← भजनांकडे परत

सार पैं सांगत उपनिषद तुम्हां । वाचे रामनामा जप करा

sar pain sangat upanishad tumhan | vache ramanama jap kara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सार पैं सांगत उपनिषद तुम्हां । वाचे रामनामा जप करा ॥१॥ हेंचि पैं मथित सांगोनियां गेले । उच्चारितां ठेले ब्रह्मरुप ॥२॥ ज्योतिसी ते ज्योति भजन करील । आपणचि होईल हरी स्वयें ॥३॥ नामा म्हणे कैसें विपरीत करणें । भूतदया धरणें सर्वाभूतीं ॥४॥