भजनी मालिका
← भजनांकडे परत

सापत्न माउली होती वोंवरींत । ऐकीला भावार्थ दोघांचाहि

sapatna mauli hoti vonvarint | aikila bhavartha doghanchahi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सापत्न माउली होती वोंवरींत । ऐकीला भावार्थ दोघांचाहि ॥१॥ बुद्धीचा कांतर बुब्दुदला मोठा चावीतसे ओंठा खेद बहु ॥२॥ निघुनी ते वेगीं आली रायापाशीं । म्हणे या पोरासी कां घेतलें ॥३॥ मांडी बैसवीसी लाडानें बोलवीसी । पाहूं आतां कैसी लोचनीं मीं ॥४॥ शरीर त्यागावें कीं त्यासी मारावें । हेंचि जीवें भावें वाटे मना ॥५॥ मागेंपुढें कांहीं न पाहे द्दष्टीस । लोटिलें बाळक पायें तिनें ॥६॥ नामा म्हणे राजा तियेचा अंकिला । झाला चाकाटला आपुल्या ठायीं ॥७॥