भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतोषाकारणें सज्जन जीवासी । साहाकारी होसी ना-रायणा

santoshakaranen sajjan jivasi | sahakari hosi na-rayana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संतोषाकारणें सज्जन जीवासी । साहाकारी होसी ना-रायणा ॥१॥ समान करिसी सर्वाभूतीं जाण । पतीत पावन भाक तुझी ॥२॥ भक्ति भाव ज्यांचा भाग्यें आगळिया । होसी देवराया सर्वविध ॥३॥ समर्थपणासी कोणा विचारावें । नामा म्हणे भावें कारण हा ॥४॥