भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसमागम फळला रे मला । सन्मानाचा जाला लाभ मोठा

santasamagam phalala re mala | sanmanacha jala labh motha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संतसमागम फळला रे मला । सन्मानाचा जाला लाभ मोठा ॥१॥ अतीथि आदर केला मुक्ताबाई । लांकडानें डोई फोडिली माझी ॥२॥ देवानें गोंधळ घातला गरुडपारीं । भिजली पितांबरी अश्रुपातीं ॥३॥ माझें माझें म्हणोनि गाईलेंज गार्‍हाणें । कळलें संतपण हेंचि तुमचें ॥ भरी भरोनियां आलों तुम्हांज जवळी । कैकाड मंडळी ठावी नोव्हे ॥५॥ नामा म्हणे सन्मान पावलों भरून । करितां गमन बरें दिसे ॥६॥