भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा तो संग नव्हे मलतैसा । पालटावी दशा तात्काळिक

santancha to sang navhe malataisa | palatavi dasha tatkalik

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संतांचा तो संग नव्हे मलतैसा । पालटावी दशा तात्काळिक ॥१॥ चंदनाचे संगें पालटती झाडें । दुर्बळ लांकडें देवामायां ॥२॥ हें कां ऐसें व्हावें संगती स्वभावें । आणिकें न पालटावें देहालागीं ॥३॥ तैसा नि:संगाचा संग अग्रगणी । जनी ध्याय मनीं ज्ञानेश्वरा ॥४॥