भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत पाहुणेरा सज्जनाचे घरीं । पूजा करितां वरी डोईं काढी

sant pahunera sajjanache gharin | puja karitan vari doin kadhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संत पाहुणेरा सज्जनाचे घरीं । पूजा करितां वरी डोईं काढी ॥१॥ करितां सन्मान अंगीं भरे ताठा । देवा पैं करंटा असुनी काय ॥२॥ अहंता हा खुंट वाढविला चित्तीं । न साहे संगती सज्जनाची ॥३॥ पंढरीचें भूषण सांगतो जनांसी । नाहीं या मनासी तीळ बोध ॥४॥ म्हणे मुक्ताबाई चांगदेवा वाणीअ । भजावा सज्जनीं नामदेव ॥५॥