भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारी गांजलों म्हणोनि शरण आलों । पाठीसि रिघालों देवराया

sansari ganjalon mhanoni sharan alon | pathisi righalon devaraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारी गांजलों म्हणोनि शरण आलों । पाठीसि रिघालों देवराया ॥१॥ कळिकाळा वास पाहूं तूं न देसी । भरंवसा मानसीं आहे मज ॥२॥ नामा म्हणे देवा स्वामिया तूं एक । आवडता सेवक करीं मज ॥३॥