भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार पाल्हाळ सांगसी परिकर । नाम तें श्रीधर न म्हणसी

sansar palhal sangasi parikar | nam ten shridhar na mhanasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसार पाल्हाळ सांगसी परिकर । नाम तें श्रीधर न म्हणसी ॥१॥ कैसें तुज उद्धरण होईल गव्हारा । भजन त्या हरीहरी करी वेगीं ॥२॥ योनी नानाविद्या पावसी आपदा । हाचि खेळ सदा स्मरतोसि ॥३॥ नामा म्हणे लटिकें प्रपंचासी मुके । राम हेंचि मुखें जप करी ॥४॥