भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडुनी वैकुंठ न धरत पातलों । तुज भेटावया आलों पुंडलिका

sanduni vaikunth na dharat patalon | tuj bhetavaya alon pundalika

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सांडुनी वैकुंठ न धरत पातलों । तुज भेटावया आलों पुंडलिका ॥१॥ प्रीतीचा वोरसू ह्लदयीं दाटला । नुठेचि कां वहिला आलिंगना ॥२॥ भक्त शिरोमणी आमचा जीवलग । म्हणे पांडुरंग पुंडलिका ॥३॥ स्फुरती भुजादंड आणि वक्षस्थळ । हरुषें नयनक-मळ विकासलें ॥४॥ आनंदें रोमांच उद्भवले आंगीं । क्षेमा देई वेगीं भक्ताराया ॥५॥ मज नामरूप तुमचेनी संभ्रमें । केलीं जन्म कर्में असंख्यात ॥६॥ तुमचीया आवडी असे म्यां विकिला । सांग कोण्या बोला रुसलासी ॥७॥ ह्लदयींचें निजगुज सांगरे सकळीक । तेणें मज सुख होईल जीवा ॥८॥ परतोनियां दृश्टि पाहें आळूमाळ । तेणें हरेल सकळ श्रम माझा ॥९॥ ऐसा भक्तजनवत्सलू भक्तांचा विसावा । भक्तांचिया भावा भाळलासे ॥१०॥ कटावरी दोनी हात उभा पुंडलिका द्बारीं । नामया स्वामी हरि विनवीतसे ॥११॥