भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडीं सांडीं पसारा विषयाचा चारा । विठ्ठल मोहरा वोळंगे वेगीं

sandin sandin pasara vishayacha chara | viththal mohara volange vegin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सांडीं सांडीं पसारा विषयाचा चारा । विठ्ठल मोहरा वोळंगे वेगीं ॥१॥ होईल तुझें हित होसिल पूर्ण भरित । सर्वांभूतीं हित हेचि दया ॥२॥ वोळंगे विठ्ठलरूपा मार्ग हाचि सोपा । विष-याच्या खेपा तुटतील ॥३॥ नामा म्हणे केवळ आह्मां नित्य काळ । दिननिशीं पळ विठ्ठल देव ॥४॥