भजनी मालिका
← भजनांकडे परत

समस्त मिळोनि गोपाळीं । तया यमुनेच्या पाबळीं

samasta miloni gopalin | taya yamunechya pabalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समस्त मिळोनि गोपाळीं । तया यमुनेच्या पाबळीं । कृष्णे मांडिली धुमाळी । कळंबा तळीं आनंद ॥१॥ वळूनि कांबळ्या वेठी । त्याही बांधिल्या मणगटीं । विवाद मांडिला निकटी । धुर्जटी कान्होसी ॥२॥ आतां कृष्णा कव्णे ठायीं । जासी तुजवरी आली डाई । आमची हमामा हुंबरी देईं । उभा राहें पैं कांगा ॥३॥ कृष्ण म्हणे मी एकवटू । तुम्ही आम्ही गडी वाटूं । गोवळी घातलासे हाटू । अति निकटू कान्हुसी ॥४॥ म्हणे बळीराम पहागा । बोल नव्हे तुम्हाजोगा । तुम्ही समर्थ श्रीरंगा । आम्हां कांगा भेटविसी ॥५॥ ऐसा सकळीं मान केला । तेव्हां कृष्ण संतोषला । आनंद चित्तासी पावला । म्हणे भला भला नाम्या ॥६॥