भजनी मालिका
← भजनांकडे परत

समस्त भक्तमंडळीसहित वनमाळी । प्रवेशले राउळीं परमानंदे

samasta bhaktamandalisahit vanamali | praveshale raulin paramanande

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समस्त भक्तमंडळीसहित वनमाळी । प्रवेशले राउळीं परमानंदे ॥१॥ राही रखुमाई सत्यभामा वेगीं । देवातें अष्टांगी नमस्कारिती ॥२॥ बाप सुखसिंधु स्वामी आर्तबंधु । प्रीति परमानंदु निजभक्तां ॥३॥ सत्यभामेणें केलें प्रक्षाळण चरणां । रुक्माई विंजना जाणविती ॥४॥ विडा देती राही उभी उजव्या बाही । दृष्टी ठेवुनि पायीम कवळी मनें ॥५॥ शुक सनकादिक नारद तुंबर । करती जयजयकार नामघोषें ॥६॥ आले बंदीजन पढती ब्रीदावळी । ध्यान ह्रदयकमळीं चंद्रचूडा ॥७॥ निवृत्ती ज्ञानेदेव सोपान सांवता । जवळी त्या जनमित्रा बोलाविलें ॥८॥ सकळिक संताम परमानंदे तृप्ती । सारोनि श्रीपति आरोगणा ॥९॥ बैसोनि एकांती पंढरीचा राणा । करितसे विचारणा निजभक्तांसी ॥१०॥ सकळिक ब्राह्मण आणावे भोजना । निरसावी वासना संदेहाची ॥११॥ उठोनि प्रातःकाळी यावेम शीघ्रवत । द्यावया अक्षत ब्राह्मणांसी ॥१२॥ निजबोधे आनंदे हर्षे खेळेमेळे । भोगावे सोहळे स्वानंदाचे ॥१३॥ फेडवी तयाची भेदभरदृष्टी । द्यावी तया भेटी निजरुपाची ॥१४॥ संतसंगतीचा प्रगट व्हावा महिमा । द्यावा भक्तिप्रेमा नामयासी ॥१५॥