भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थासी करीं क्रोध हे अहंता । अखंड ममता मानी सदा

samarthasi karin krodh he ahanta | akhand mamata mani sada

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समर्थासी करीं क्रोध हे अहंता । अखंड ममता मानी सदा ॥१॥ आपुली आपण व्यर्थ सांगे स्तुति । वडिलांची कीर्ति भोग सांगे ॥२॥ वमन झालीया सांचितसे अन्न । काय तो दुर्जन भाग्यहीन ॥३॥ नामा ह्मणे जाण असतां शरीरीं । जातो यमपुरीं भोगावया ॥४॥