भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकाम निष्काम वाचे जपे नाम । तो माझा परम प्राणसखा

sakam nishkam vache jape nam | to majha param pranasakha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकाम निष्काम वाचे जपे नाम । तो माझा परम प्राणसखा ॥१॥ जीवाहूनि आवडता न करी जीवापरता । पूजी परम देवता भावें त्यासी ॥२॥ हे माझी प्रसिद्धि जगीं ब्रीदावळी । हरिदासाचे कुळीं वोळंगे सदा ॥३॥ जन्मोनि ज्याचे कुळीं एक हरिदास । धन्य त्याचा वंश पुण्यशीळ ॥४॥ काया वाचा मनें न विसंबे त्यासी । ते माझ्या दैवासी दैव जाले ॥५॥ नामधारकाचें उच्छिष्ट जेथें पडे । उभा राहोनि पुढें झेली मुखें ॥६॥ तें मज गोमटें सेविताम सुख वाटे । म्हणोनि धाटें मोठें शरीर माझें ॥७॥ बहु कांति पुष्टि यश कीर्ति प्रभा । नित्य नवी शोभा होय तेणें ॥८॥ ते संत सोयरे भेटती जे वेळीं । ते माझी दिवाळी दसरा सण ॥९॥ म्हणोनी नामयातें जेवविलें सांगातें । बहु दिवस होतें आर्त पोटीं ॥१०॥ जालें तें सर्वथा नोहे पैं अन्यथा । पुढतीं सांगा आताम काय करणें ॥११॥