भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्रनामाची घालितां लाखोली । तरला हा कोळी वाल्मिक तो

sahasranamachi ghalitan lakholi | tarala ha koli valmik to

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सहस्रनामाची घालितां लाखोली । तरला हा कोळी वाल्मिक तो ॥१॥ पुराणप्रसिद्ध गोष्टी ह्या ऐकाव्या । प्रत्यक्ष देखा-व्या कोणे ठायीं ॥२॥ अंगअनुभवा आपण आणाव्या । तरीच वाणाव्या संतांपुढें ॥३॥ नाहीं तरी मज वाटे कांनकोडें । सुधा ह्मणे तोंड चवी नेणें ॥४॥ नामा ह्मणे असे पोटामध्यें भूक । तृप्तीचें ते सुख बोलों कैसें ॥५॥