भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधनांत सोपें नाम हें केवळ । याविण सकळ शीण वायां

sadhanant sopen nam hen keval | yavin sakal shin vayan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साधनांत सोपें नाम हें केवळ । याविण सकळ शीण वायां ॥१॥ धरी रे धरा नाम विठोबाचें । तेणें अज्ञानाचें मूल नासे ॥२॥ नाम तारी फार पुराणीं वर्णिलें । नामचि केवळ आत्मसत्ता ॥३॥ नामा म्हणे नामीं रंगला सुरंग । अंगें स्वयमेव पांडुरंग ॥४॥