भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधनाच्या माजी एक गजरातू । साधी त्यासी उजू होय पहा

sadhanachya maji ek gajaratu | sadhi tyasi uju hoy paha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साधनाच्या माजी एक गजरातू । साधी त्यासी उजू होय पहा ॥१॥ नासिकाचें वारें कोंडोनियां प्राणें । उपराटें जाणें ऊर्ध्वपंथें ॥२॥ गुदस्थानीं टांच देऊनियां जाण । कासावीस प्राण होती पहा ॥३॥ गोल्हाट भेदिसा कोल्हाटीच नाहीं । विठोबाची ग्वाही नामा ह्मणे ॥४॥