भजनी मालिका
← भजनांकडे परत

सद्‌गुरुवांचुनी नाम न ये हातां । साधन साधितां कोटी गुणें

sad‌guruvanchuni nam na ye hatan | sadhan sadhitan koti gunen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सद्‌गुरुवांचुनी नाम न ये हातां । साधन साधितां कोटी गुणें ॥१॥ जैसा कांतेविण करणें संसार । तैसा हा व्यापार साधनांचा ॥२॥ जंव सद्‌गुरु नाहीं केला भ्रतार । साधनाविचार व्यर्थ गेला ॥३॥ नामदेव म्हणे सद‌गुरुपासोनी । नाम घ्या जाणोनी नाना कांहीं ॥४॥