भजनी मालिका
← भजनांकडे परत

सद्‌गुरुनायकें पूर्ण कृपा केली । निजवस्तु दाविली माझी मज

sad‌gurunayaken purna krupa keli | nijavastu davili majhi maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सद्‌गुरुनायकें पूर्ण कृपा केली । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥ माझें सुख मज दावियेलें डोळां । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥ तया उतराई व्हावें कवण्या गुणें । जन्म नाहीं येणें ऐसें केलें ॥३॥ नामा म्हणे निकीज दावियेली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥