भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदाशिवापुढें कोण अनुष्ठानी । अष्टांग लावूनि नमस्कारी

sadashivapudhen kon anushthani | ashtang lavuni namaskari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सदाशिवापुढें कोण अनुष्ठानी । अष्टांग लावूनि नमस्कारी ॥१॥ नाम यज्ञ जप ऋषीश्वर ध्याती । शीतळ ते होती काळकूट ॥२॥ सर्वांमाजीं श्रेष्ठ नाम कलियुगीं । रामकृष्ण जगीं नामनौका ॥३॥ नामा म्हणे नाम अखंडित स्मरा । पांडुरंग भजा वेगीं ॥४॥