भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा सोमवारीं विभूति लावूनि शिरीं । तुमच्या मं-दिरीं आलाप करीं

sada somavarin vibhuti lavuni shirin | tumachya man-dirin alap karin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सदा सोमवारीं विभूति लावूनि शिरीं । तुमच्या मं-दिरीं आलाप करीं ॥१॥ शंकर त्रिपुरारी हरि उच्चारी । म्हणती षडाक्षरी पावें मज ॥२॥ ॐनम: शिवाय हरहर जय जय । नाहीं भवभय तुझेनि नामें ॥३॥ करिती शिवरात्री वाहाती बेलपत्री । प्रगत होऊनि गाती भक्तिभावें ॥४॥ बोलती सत्कीर्ति जिंतिलें पवित्रीं । हरहर नाम मंत्रीं तुज पूजिती ॥५॥ रुद्राक्षाच्या माळा घालूनियां गळां । तो तुह्मां जवळां सर्व मान्य ॥६॥ शिवशंभु भोळा बहुतां पुण्ये जोडला । पावे जाश्वनीळा ह्मणे नामा ॥७॥