भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा पैं परिपूर्ण जयाचें रुपडें । तेथेंचि माजीवडे मन करी

sada pain paripurna jayachen rupaden | tethenchi majivade man kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सदा पैं परिपूर्ण जयाचें रुपडें । तेथेंचि माजीवडे मन करी ॥१॥ होईल उद्धार सुटेल संसार । सर्व मायापूर दुरी होय ॥२॥ कांठाळा कायेचा दुरावा मायेचा । हेंचि जप वाचा स्मरे नाम ॥३॥ नामा म्हणे करी सर्व हरी हरी । राम हें उत्तरीं वाखाणी पां ॥४॥