भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋषि म्हणती धर्मदेवा । आमचा आशिर्वाद ध्यावा

rushi mhanati dharmadeva | amacha ashirvad dhyava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऋषि म्हणती धर्मदेवा । आमचा आशिर्वाद ध्यावा ॥१॥ पांडवपालक गोविंद । तिहीं लोकीं गाजे ब्रिद ॥२॥ भक्तिभावें केला वश्य । हरि सांभाळी तयास ॥३॥ रात्नंदिवस तुम्हांपासीं । दुजा ठाव नाहीं त्यासी ॥४॥ देव द्रौपदीतें सांभाळी । उंभा पाठीसी वनमाळी ॥५॥ वनीं सांभाळी पांडवांसी । सुदर्शन त्याजपाशीं ॥६॥ हरिभक्तिं जाहला ऋणी । म्हणे नामयाची जनी ॥७॥