भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवीं । अनुदिनीं आठवीं चरण तुझे

ratrandivas khanti vate majhe jivin | anudinin athavin charan tujhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवीं । अनुदिनीं आठवीं चरण तुझे ॥१॥ ने रे पांडुरंगा आपुलिया गांवा । तूं माझा विसावा जिवलग ॥२॥ मी येक येकट रंकाहूनि रंक । त्रिभुवननायक कीर्ति तुझी ॥३॥ मी तुझें पोसणें दास पैं दुर्बळ । तूं दिनदयाळ स्वामी माझा ॥४॥ तुझें मी अनाथ चरणीं ठेवीं माथा । सांभाळीं सर्वथा ब्रीद तुझें ॥५॥ नामा म्हणे विठो जालों कासावीस । पुरवीं माझी आस मायबापा ॥६॥