भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनाम वाचे बोल । तया पुरुषा नाहीं मोल

ramanam vache bol | taya purusha nahin mol

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रामनाम वाचे बोल । तया पुरुषा नाहीं मोल ॥१॥ धन्य तयाचें शरीर । बरे जना उपकार ॥२॥ ऋणियां तो तारी । विश्व व्यापक तो हरि ॥३॥ नामा म्हणे स्वामी । सुखें वसे अंतर्यामीं ॥४॥